सेवा सदनच्या आर. के. तलरेजा महाविद्यालयातील मराठी विभाग १९६२ पासून कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या अकादमिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातील मराठी विभागाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा, वैचारिक सहिष्णुता, लोकशाही मूल्यं आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन या विचारचौकटीचे अधिष्ठान मराठी विभागाच्या कामकाजाच्या मुळाशी आहे. अनुदानित पदव्युत्तर विभाग हे मराठी विभागाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मराठी साहित्य या अभ्यासविषयाचे पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील अध्यापन विभागामार्फत केले जाते. विभागातील प्राध्यापकांच्या बरोबरीने अभ्यागत प्राध्यापकांच्या सहकार्यातून पदव्युत्तर पातळीवरील कार्यभार सांभाळला जातो. पारंपरिक व्याख्यानपद्धतीच्या बरोबरीने परिसंवाद, गटचर्चा, माहितीपट-मुलाखत-व्याख्यान-नाटक-चित्रपट इत्यादींचे प्रसारण, नाट्यसंमेलन, साहित्यसंमेलनासारख्या ठिकाणी क्षेत्रभेट, विद्यापीठीय पातळीवरील चर्चासत्रात सहभाग, शैक्षणिक सहलींचे आयोजन अशा विविध मार्गांचा अवलंब करीत अभ्यासविषयात गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न प्राध्यापकांकडून केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि साहित्यिक कौशल्ये निर्माण करणे हे विभागाचे केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे. मात्र साहित्याच्या बरोबरीने संगीत, चित्रकला, चित्रपट आदी ललितकलांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना मंच उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील सामाजिक संवेदनशीलतेचा विकास घडवून आणणे आदी उद्दिष्टे समोर ठेवून मराठी विभाग मराठी वाङ्मय मंडळाच्या सोबतीने अभिनव उपक्रम (विविध स्पर्धा, अभ्यागतांची व्याख्याने, शुद्धलेखन कार्यशाळा, नाट्यकार्यशाळा इत्यादी. ) आणि बहुरंगी कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतो. ‘पुस्तकगप्पा’ आणि ‘शब्दगंध’ सारखे उपक्रम हे मराठी विभागाचे उल्लेखनीय विशेष असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती निर्माण करण्याचा आणि ती जोपासण्याचा अत्यंत आव्हानात्मक प्रकल्प या मंचावरून राबविला जातो.
Photo | Name & Designation | Qualification | Teaching Experience | Profile Link |
---|---|---|---|---|
Dr. Sheetal K. Pawaskar-Bhosale (H.O.D.) Associate Professor |
M.A., SET ,PhD | 22 Years
|
View | |
Dr. Prajakta Ramdas Shitre Assistant Professor |
M.A., M.Phil., P.hd., NET, SET, MS -CIT | 17 Years |
View |